Sairat Jhala Ji

Album cover art for "Sairat Jhala Ji" by Chinmayi

Chinmayi - Pop, Duet

Sairat Jhala Ji

21.7K Plays

Duration: 6:10

View ArtistView Album

Lyrics

Language:

अलगुज वाजं नभात भलतंच झालंया आज अलगद आली मनात पहीलीच तरनी ही लाज हो आगं झनानलं काळजामंदी आन् हातामंदी हात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी हं बदलून गेलंया सारं पिरतीचं सुटलंया वारं अल्लड भांबावल्यालं बिल्लोरी पाखरु न्यारं आलं मनातलं ह्या व्हटामंदी आन् हातामंदी हात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी हं कवळ्यापनात ह्या सावळ्या उन्हात ह्या बावळ्या मनात ह्या भरलं, भरलं तुझं गाणं मनामंदी घुमतयं कानामंदी सुर सनईचं राया सजलं हे सजलं, ऊनवारं नभतारं सजलं रंगलं मन हळदीनं रानी रंगलं सरलं हे जगण्याचं झुरणं सरलं भिनलं नजरनं इश जहरी भिनलं आगं धडाडलं ह्या नभामंदी आन् ढोलासंगं गात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी हं आकरीत घडलंया सपान हे पडलंया गळ्यामंदी सजलंया डोरलं, डोरलं साताजल्माचं नात रुजलंया काळजात तुला रं देवागतं पुजलं हे रुजलं, बीज पिरतीचं सजनी रुजलं भिजलं मन पिरमानं पुरतं भिजलं सरलं मन मारुन जगनं सरलं हरलं ह्या पिरमाला समदं हरलं आगं कडाडलं पावसामंदी अन् आभाळाला याद आलं जी

Rate this song

Rate this song

0/5.0 - 0 Ratings

5
0.0% (0)
4
0.0% (0)
3
0.0% (0)
2
0.0% (0)
1
0.0% (0)

Loading comments...

Credits

Writers
  • Nagraj Manjule
  • Ajay-Atul